'झी मराठी'च्या नव्या मालिकेसाठी 'कोकण हार्टेड गर्ल'ची महत्त्वाची भूमिका ; व्हिडीओ आला समोर पहा...
'झी मराठी'च्या नव्या मालिकेसाठी 'कोकण हार्टेड गर्ल'ची महत्त्वाची भूमिका ; व्हिडीओ आला समोर पहा...
img
Dipali Ghadwaje

बिग बॉस फेम मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर  नेहची आपल्या रिल्स आणि व्लॉग्समुळे चर्चेत असते. आता अशाच आणखी एका व्हिडीओमुळे अंकिता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

'कोकण हार्टेड गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंकिता वालावलकरनं एका नव्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. याची माहिती तिनं स्वतः सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत दिली आहे. 'झी मराठी'च्या नव्या मालिकेसाठी तिनं गाणं लिहिलं आहे. तसेच, या गाण्याची झलक अंकितानं तिच्या व्हिडीओमधून दाखवली आहे. 

अंकिता वालावलकर म्हणजेच, 'कोकण हार्टेड गर्ल'नं स्वतः 'झी मराठी'च्या नव्या मालिकेसाठी लिहिलेलं गाणं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत चाहत्यांना ऐकवलं आहे. 23 डिसेंबरपासून 'झी मराठी'वर एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे, या मालिकेचं शीर्षक गीत अंकितानं लिहिलं आहे.  'लक्ष्मी निवास'या बहुचर्चित मालिकेसाठी अंकिताला प्रोमो गीत लिहिण्याची संधी मिळाली याचा आनंद असल्याचंही अंकिता व्हिडीओमध्ये म्हणाली. 

 अकिंतानं इंन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडीओ :


दरम्यान, बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर झळकली होती. या सीझनची अंतिम फेरी अंकितानं गाठली होती. या पर्वाचा विजेता बारामतीचा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाण ठरला होता. बिग बॉसमुळे अंकिता महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. 


  

इतर बातम्या
Join Whatsapp Group