सध्या सोशल मीडियावर एका अनोख्या दुकानाचा फोटो व्हायरल होत आहे ज्याने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
मैदानापासून ते उंच पर्वतशिखरांपर्यंत तुम्हाला अनेक दुकाने मिळतील. पण एखादे दुकान हवेत लटकलेले पाहिले आहे का?
सध्या सोशल मीडियावर हवेत लटकणाऱ्या दुकानाचीच खूप चर्चा सुरू आहे आहे. तुम्ही विचार करत असाल की हे कसे होऊ शकते? तुमचा विश्वास बसणार नाही, पण फोटोंमध्ये तुम्हाला दुकान हवेत लटकलेले दिसत आहे, हे खरेच आहे. असे दुकान तुम्ही अजून पाहिले नसेल.
हे जगातील एकमेव दुकान आहे, जे डोंगरावर हवेत लटकत आहे. जगातील हे अनोखे दुकान चीनमध्ये आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते 393 फूट उंचीवर हवेत लटकले आहे.
या विचित्र दुकानात चहा प्यायला लोक दोरीवर चढून साहसाचा आनंद लुटतात. हे चीनच्या हुनान प्रांतातील झिन्युझाई नॅशनल जिओलॉजिकल पार्कमध्ये आहे. डोंगराच्या बाजूला एक लहान लाकडी पेटी टांगलेली आहे. या दुकानाला ‘जगातील सर्वात गैरसोयीचे दुकान’ म्हणून संबोधले गेले आहे.
झिन्युझाई नॅशनल जिओलॉजिकल पार्कमधील डोंगराच्या बाजूला असलेली हे लटकलेले खोपटेवजा दुकान लहान दिसत असले तरी ते संपूर्ण दुकान आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला दुकानाचा फोटो पाहून लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे की त्यात काय मिळतं ? एवढ्या उंचीवर दुकान बांधण्याचे कारण काय?
रिपोर्ट्सनुसार, या दुकानात गिर्यारोहकांना अन्न आणि चहासारखे पेय विकले जाते. डोंगरावर गिर्यारोहण करणाऱ्यांना मध्यभागी विश्रांतीची आवश्यकता असते. अशांसाठी हा एक विसावा म्हणावा लागेल.