हल्लीच्या चपला किंवा बुटं ही लगेच तुटतात. कारण त्या दिसायला फार सुंदर असतात पण त्यामध्ये वापरलेलं मटेरियलची क्वालिटी मात्र संशयास्पद असते. मात्र आता या भेसळयुक्त चपलांवर एका तरुणानं भन्नाट मार्ग शोधून काढलाय. अन् अशी चप्पल तयार केलीये की आयुष्यभर घातली तरी तुटणार नाही.
तुम्ही पार माऊंट एव्हरेट्सवरून तिला खाली फेकली तरी काही होणार नाही. अहो, एवढंच काय तर पाय तुटेल पण हत्ती उभा राहिला तरी ही चप्पल तुटणार नाही. विश्वास बसत नाहीये? तर मग ही जुगाडू चप्पल एकदा पाहाच. आम्ही पैज लावून सांगतो अशी चप्पल तुम्ही कधी स्वप्नातही पाहिली नसेल.
या चपलेचा फोटो marathi_old_athavani या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. ही चप्पल चक्क लोखंडापासून तयार केलीये. लोखंडी रॉड आणि एका प्लेटला चपलेच्या आकारात कापून हा जुगाड करण्यात आला आहे.
अर्थात ही चप्पल पाहून सगळेच जणं शॉक्ड झाली आहेत. व अनेक जण त्यावर विविध प्रकारच्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.