वाहनांचा वेग घेतोय जीव;
वाहनांचा वेग घेतोय जीव; " या " शहरात अपघाताची मालिका सुरूच
img
Jayshri Rajesh
पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात हिट अँड रनचे प्रकार वाढत असताना पोलिस मात्र झोपी गेलेत की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. सातत्याने घडणाऱ्या घटनांनंतरही त्यावर वेळीच कारवाई केली जात नाही. आळंदी परिसरात असाच हिट अँड रनचा प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन कार चालकाकडून नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न करण्याात आला आहे.  पूर्ववैमनस्यातून अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या हलगर्जीपणावर आता नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

आळंदी जवळील वडगाव घेणंद येथे हा प्रकार घडला आहे. अल्पवयीन कार चालकाकडुन महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.   समोरील जमावाला चिरडण्यासाठी अल्पवयीन तरुणाने कार पाठीमागे घेऊन जात पूर्ण वेगाने चालवत महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा थरार कॅमेरात कैद झाला आहे. सुदैवाने  महिलेला कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.  मात्र तरुणाच्या या मुजोरगिरीवर संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

आळंदी पोलीसांत गुन्हा दाखल

अपघाताचा थरार झाल्यानंतर हा तरुण कारच्या छतावर बसून शिवीगाळ करत होता. पूर्वीच्या भांडणाचा राग धरुन महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रकार केल्याबाबत आळंदी पोलीसांत फिर्याद देण्यात आली.  नाजुका थोरात यांच्या फिर्यादीवरुन आळंदी पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.

पुण्यात अपघाताची मालिका सुरूच

पुण्यात अपघाताची मालिका सुरूच आहे. पोर्शे कार अपघातानंतर पुण्यात 25 दिवसात 70  अपघात  झाले आहेत. 70  अपघातात तब्बल 31 जणांचा मृत्यू झाला आहे.  पुण्यातील विविध परिसरात अपघात झाला आहे.  54  जण गंभीर आणि किरकोळ जखमी  आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group