महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच मारली बाजी!
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच मारली बाजी!
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.राज्यात बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. विशेष म्हणजे मुलींनी या निकालात बाजी मारली आहे. 

यंदाच्या विद्यार्थ्यांनी टक्केवारीमध्ये धमाका केलाय.विज्ञान, कला आणि वाणिज्य तिन्ही शाखेंचा निकाल जबरदस्त लागलाय. कोकण विभाग अव्वल  ठरलाय.  यंदा सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे.

विद्यार्थी आणि पालकांना दुपारी एक वाजल्यापासून निकाल ऑनलाइन पाहता येईल. विद्यार्थ्यांना mahahsscboard.in किंवा mahresult.nic.in या संकेतस्थळावरून निकाल पाहता येणार आहे.

यावेळीही बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. या परीक्षेत ९२.६० टक्के मुले आणि ९५.४९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या.सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९७.५१ %) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा (९१.९५ %) आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group