मोठी बातमी ! दहावी आणि बारावीच्या परीक्षा ''या'' तारखेला, वेळापत्रक जाहीर
मोठी बातमी ! दहावी आणि बारावीच्या परीक्षा ''या'' तारखेला, वेळापत्रक जाहीर
img
दैनिक भ्रमर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने १० वी आणि १२ च्या परीक्षांच्या अंतिम तारखांची घोषणा करण्यात आली आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना आणि पर्यायी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने बोर्डाच्या परीक्षांचे हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
या वेळापत्रकानुसार नेहमीपेक्षा यंदाच्या शैक्षणिक वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा या आठ ते दहा दिवस आधी आयोजित होण्याची शक्यता आहे.

या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात होणार आहे. तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात होणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे याबाबत प्रसिद्धी पत्रक जारी करत माहिती देण्यात आली आहे.

लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी

>>उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा (सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम – मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी, २०२५ ते मंगळवार, दि १८ मार्च २०२५

>> प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन – शुक्रवार, दि. २४ जानेवारी २०२५ ते सोमवार, १० फेब्रुवारी २०२५

>> माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा – शुक्रवार, दि. २१ फेब्रुवारी, २०२५ ते सोमवार दि. १७ मार्च, २०२५

>> प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन – सोमवार, ०३ फेब्रुवारी २०२५ ते गुरूवार, २० फेब्रुवारी २०२५

दरम्यान ,विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर जाहीर करणे, या बाबींचा सारासार विचार करता येत्या २०२५ ची फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी इ.१२वी आणि इ.१०वीची परीक्षा नेहमीपेक्षा ८ ते १० दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा मानस आहे. त्याअनुषंगाने लेखी, प्रात्यक्षिक आणि इतर परीक्षा ठरलेल्या तारखांना घेण्याचे नियोजित आहे, असं मंडळाने म्हटलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group