दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात बोर्डाचा मोठा निर्णय! गैरप्रकार आढळून आल्यास.....
दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात बोर्डाचा मोठा निर्णय! गैरप्रकार आढळून आल्यास.....
img
Dipali Ghadwaje

दहावी आणि बारावीच्य़ा परिक्षा या तोंडावर आल्या असातानाच आता शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. बोर्डाच्या परिक्षांना कॉपी आणणं या यासारखे गैरप्रकार मोठ्य़ा प्रमाणात दरवर्षी होत असतात. त्यामुळे आता या सगळ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्त्वाचा निर्णय जारी केला आहे.

कॉपीसारख्या प्रकारात विद्यार्थ्यांना पाठीशी न घालण्यासाठी आता परिक्षा केंद्रातील केंद्र संचालाक आणि पर्यावेक्षकांनी अदलाबली करण्यात येणार आहे असा निर्णय माध्यमिक शिक्षण मंडळाने जारी केला आहे.

परिक्षा केंद्रात कॉपीचे प्रकार जास्त दरवर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत मोठ्याने होत आहेत. या सगळ्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी दहावी आणि बारावी केंद्रातील शिक्षक आणि कर्मचाऱ्य़ांची अदलाबदली करण्य़ाचा निर्णय बोर्डाकडून घेण्यात आला आहे.

कोविड काळातील परीक्षा वगळता इतर पाच वर्षांच्या काळात ज्या परिक्षा केंद्रावर कॉपी सारखे गैरप्रकार मोठ्या प्रमाणात झाले असल्याचं आढळून आले आहेत , अशा परीक्षा केंद्रात केंद्रसंचालक आणि पर्यावेक्षक म्हणून इतर शाळेतील शिक्षकांची नियुक्ती केली जाईल असा निर्णय शिक्षण मंडाळाने जारी केला आहे.

कॉपीसारखे गैरप्रकार बोर्डाच्या परिक्षेस होत असल्याची बाब गंभीर आहे म्हणून काही दिवसांपूर्वीच सरसकट सगळ्याच परिक्षा केंद्रतील पर्यावेक्षक आणि केंद्र संचालकांबाबत हा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र बोर्डाचा हा निर्णय काही शाळांनी अमान्य केला होता. बोर्डाने दिलेला हा निर्णय म्हणजे सरसकट सगळ्याच शाळा, शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर अविश्वास दाखविल्यासारखे असल्याची खंत शिक्षकांनी व्यक्त केली होती.

दरम्यान या निर्णयावर पुनर्विचार करत शिक्षण मंडळाने कॉपी सारख्या गैरप्रकाराला जबाबदार असलेल्या परीक्षा केंद्रांना धारेवर धरत, या निर्णयास पात्र शिक्षक आणि परिक्षा केंद्र संचालकांची अदलाबदली करणार असल्याचे सांगितलं आहे. त्याचबरोबर आता ज्या परीक्षा केंद्रात कॉपी आणि इतर अन्य गैरप्रकार आढळून येतील अशा शाळांच्या परीक्षा केंद्र म्हणून असलेली मान्यता कायमची रद्द करण्यात येईल, तसंच त्य़ा शाळांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे सचिव  देविदास कुलाळ यांनी दिली आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group