"या" ठिकाणी आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ! उशीर झाल्याने सुरक्षारक्षकाकडून विद्यार्थ्यांना धक्काबुक्की
img
Dipali Ghadwaje

आज पुणे येथे मुंबई महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागाची परीक्षा होती. दरम्यान विद्यार्थ्यांना 1 मिनिटे परीक्षा केंद्रावर पोहचायला उशीर झाल्याने त्यांना परिक्षा केंद्रात प्रवेश नसल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , हडपसर भागात असणाऱ्या रामटेकडी येथील N Digital झोन या केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होती. सकाळी 8.30 वाजेपर्यंत प्रवेश देण्याची वेळ होती. एक मिनिट अनेक विद्यार्थीना उशीर झाला म्हणून त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. तसे सुरक्षारक्षकांनी विद्यार्थ्यांना धक्काबुक्की करण्यात आली.

या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे,  व्हिडीओ मध्ये दिसत आहे कि तेथील सुरक्षारक्षक विध्यार्थ्यांना ओडताना दिसत आहेत. विशेषतः मुलींना धक्काबुकी करण्यात आली आहे. व त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांना वानवडी पोलिस स्टेशन येथे घेऊन गेले आहेत. आता या प्रकरणात पुढे काय होईल ते बघणं महत्वाचं ठरेल

 

इतर बातम्या
Join Whatsapp Group