महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी बारावीच्या निकालाची तारीख ठरली..!  'या' तारखेला लागणार निकाल....
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी बारावीच्या निकालाची तारीख ठरली..! 'या' तारखेला लागणार निकाल....
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल कधी असा प्रश्न सध्या वारंवार विचारला जातोय. अशातच राज्यातील दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी समोर आली आहे.निकाल वेळेत लावण्याचे नियोजन बोर्डाने केले आहे. त्यानुसार २५ मेपर्यंत बारावीचा तर दहावीचा निकाल ६ जूनपूर्वी जाहीर होईल, अशी माहिती बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला दिली. 

दरम्यान परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलैमध्ये होईल, असेही त्यांनी सांगितले. यंदाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला १७ लाख तर इयत्ता बारावीसाठी १२ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. आता इयत्ता बारावीच्या ९९ टक्के उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या आहेत. तर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या ८५ टक्के उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या आहेत. बोर्डाकडून दररोज उत्तरपत्रिका तपासणीचा आढावा घेतला जात आहे. 

प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण सध्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर यापूर्वीच नोंदवून ठेवले असून आता उत्तरपत्रिका तपासून जशा जशा पूर्ण होतील तसे गुणपत्रिका तयार होत आहेत.

आता एका महिन्यात इयत्ता बारावीचा निकाल जाहीर होईल. त्यानंतर इयत्ता दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे. गतवर्षी बारावीचा निकाल २५ मे रोजी लागला होता. यंदाही त्याचवेळी किंवा त्यापूर्वी निकाल जाहीर होईल, असेही बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group