नवी दिल्ली : संसदेचं पावसाळी अधिवेशन नुकतंच संपन्न झालेलं आहे. त्यानंतर आता पुन्हा पाच दिवसांचं विशेष सत्र बोलावण्यात आलेलं आहे. या सत्रामध्ये १० विधेयकं मांडली जाणार आहेत.
संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी ट्वीट करुन याबद्दल माहिती दिलीय.
१८ ते २२ सप्टेंबर दरम्यान हे सत्र बोलावण्यात आलेलं आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वीच संसदेचे विशेष सत्र बोलावण्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान 5 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होतंय.
संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिलीय.
त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की, संसदेचं विशेष अधिवेशन 18 ते 22 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये 5 बैठका होणार आहेत.