देशात 18व्या लोकसभेच्या स्थापनेनंतर मोदी सरकार तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024 च्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन संपले आहे. ज्यामध्ये नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली गेली.
लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संबोधित केले. आता अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. संसदेचे हे अधिवेशन 22 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये मोदी 3.0 सरकार करदात्यांसाठी काही मोठी घोषणा करतील अशी शक्यता आहे. केंद्र सरकार केंद्रीय अर्थसंकल्पात ग्रामीण घरांसाठी राज्य अनुदान वाढवण्याची तयारी करत आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 50 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.