अर्थसंकल्पावर CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया ...  म्हणाले....
अर्थसंकल्पावर CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया ... म्हणाले....
img
Dipali Ghadwaje
अर्थमंत्री निर्मला सीतारमण  यांनी आज सलग सहाव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यंदा निवडणुकीचं वर्ष असल्यामुळे अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला.  दरम्यान रोटी, कपडा, मकान देणारं मोदी सरकारचा अर्थसंकल्प आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. ते म्हणाले आहेत की, आज कौशल्य विकास सुरु करण्यात आलं आहे.

आशा सेविकांसाठी यांना योजना आणली. कोणतीही दरवाढ न करता पायाभूत सुविधांसाठी ११ हजार कोटी अर्थसंकल्पात आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडलेल्या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी शिंदे म्हणाले, आम्ही ३ कॉरिडॉर उभे करत आहेत. रस्ते त्याचबरोबर रेल्वेची कनेक्टिविटी मोठ्या प्रमाणावर मजबूत कशी होईल, यावर भर दिला जात आहे. ५ ट्रिलयन डाॅलरचं मोदींचं टार्गेट आहे. या विकासकामांमुळे त्याला गती येईल. 

तसेच बोलताना ते पुढे म्हणाले, ''हा सर्व समावेशक अर्थसंकल्प असून विकसित भारत या ध्येयाकडे वाटचाल करणारा हा अर्थसंकसल्प आहे.'' शिंदे म्हणाले, विरोधकांच्या योजना कागदावर होत्या त्या आम्ही प्रत्यक्षात आणल्या. ८० कोटी लोकांना मदत केली. विरोधकांना आरोप करण्याशिवाय काही राहिलं नाही. 

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, इंडिया आघाडीकडे १ नेता उरला नाही. त्यांचा सुपडा साफ झाला आहे. अबकी बार ४०० पार ही गॅरेंटी जनतेने घेतली आहे. घरी बसणाऱ्यांना लोकं घरीच बसवतात, काम करणाऱ्यांना पून्हा निवडून आणतात, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे याना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group