पंतप्रधान मोदींच्या सभेआधी माध्यम प्रतिनिधिंशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही टीका केली. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष महाराष्ट्रावर दरोडा टाकल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. दरम्यान मविआ सरकार विकासाचे मारेकरी होते. तसेच उद्धव ठाकरेंनी राज्यातील लोकांना अंधारात ढकलले असल्याची टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
दरोडेखोर कोण विकास करणारे की विकासाचे मारेकरी? काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
अडीच वर्षात या महाराष्ट्रात फक्त दरोडाच टाकला. लोकांना अंधारात ढकलले, राज्याला दहा वर्षे मागे नेले, सर्व विकासकामे बंद केले मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प, जलयुक्त शिवार, समृद्धी महामार्ग, मेट्रो बंद हे सर्व प्रकल्प बंद केले. या लोकांनी कोविडमध्ये देखील कोविड सेंटरमध्ये, खिचडीमध्ये, डेड बॉडीच्या बॅगमध्ये घोटाळा केल्याचा आरोप मुख्यमंत्री शिंदेंनी केला. त्यामुळे ते दरोडा टाकणारे ते आहेत.
आम्ही अडीच वर्षात विकास केला. कल्याणकारी विकास योजना आणल्या. विकास आणि कल्याणकारी योजना याची सांगड घातली त्यामुळे जनतेला माहित आहे दरोडा कुणी टाकला, असं मुख्यमंत्री म्हणालेत.
सर्वांना योजनांचा लाभ फेक निगेटिव्ह पसरवून मुस्लीम लोकांना घाबरून महाविकास आघाडीने प्रचार केला. संविधान बदलणार हे सर्व सांगून मुसलमान आणि दलितांना महाविकास आघाडीने फसवले. संविधान बदलू शकत नाही, पण फेक नेरिटीव्ह यांनी पसरवले. पण आता फसलेले लोक देखील हुशार झाले हे त्यांना माहिती आहे. ख्रिश्चन, मुस्लिम आणि आदिवासी सर्वांनाच आम्ही पैसे देत आहोत, त्यामुळे आमच्यासाठी सर्व समान आहेत.असे एकनाथ शिंदे म्हणाले.