राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजले असून राजकीय वर्तुळात अनेक घडामोडींना वेग आलं आहे. दरम्यान, कुर्ल्यात शिवसेना शिंदे गटाच्या प्रचाराचा नारळ फुटला. यावेळी आयोजित सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठं वक्तव्य केले आहे.
यावेळी त्यांनी लाडक्या बहिणींना लखपती झालेलं पाहायचं आहे असंही म्हटलं आहे. ते बोलताना म्हणाले की, लाडक्या बहिणींना भाऊबीजेच्या शुभेच्छा देतो, आता तुम्हाला वर्षाला नहीं तर महिन्याला भाऊबीज मिळणार आहे. विरोधक म्हणतात लाडकी बहीण योजना बंद होईल, आम्ही महिलांना विकत घेतलं असं म्हणतात. या योजनेत खोडा टाकणाऱ्यांना लाडकी बहीण जोडा दाखवणार आहे. ते मुंबई हायकोर्टात गेले, पण हायकोर्टानं त्यांना लाफा मारला.
विरोधक म्हणतात आमचं सरकार आलं की या योजनेची चौकशी करून योजना बंद करणार, तुमच्या लाडक्या भावाला जेलमध्ये टाकलेलं तुम्हाला चालेल का? असा सवाल करतानाच योजना सुरू करणे जर गुन्हा असेल तर असे दहा गुन्हे मी करेल असंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.