सुप्रिया मुख्यमंत्री झाल्या तर आनंदच मात्र सुप्रिया यांना देशाच्या राजकारणात अधिक रस - शरद  पवार
सुप्रिया मुख्यमंत्री झाल्या तर आनंदच मात्र सुप्रिया यांना देशाच्या राजकारणात अधिक रस - शरद पवार
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. राज्यात सर्वत्र महायुती, महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांच्या सभा सुरु आहेत. आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. राज्यात प्रचार अखेरच्या टप्प्यात आला आहे. येत्या 18 तारखेला संध्याकाळी प्रचाराची मुदत संपेल. त्यानंतर 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल

दरम्यान महाविकास आघाडीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार याबाबत आघाडीतील नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. उद्धव ठाकरे यांनी जागावाटप आणि प्रचाराला सुरुवात होण्याआधी, 'मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा' अशी मागणी केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पहिले महायुतीला सत्तेतून बाहेर खेचणे हे आमचे कर्तव्य असल्याचे म्हणत या मुद्दाला बगल दिली होती. मात्र शरद पवारांनी आता पहिल्यांदाच याबाबत स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे.

 शरद पवारांची भूमिका नेमकी काय आहे ?

शरद पवार यांनी एका मराठी वृत्त संस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी विविध विषयांवर आपली मते स्पष्टपणे मांडली. यामध्ये मुख्यमंत्री कोणाचा असावा यासंदर्भातही त्यांनी आपले मत व्यक्त केले. लाडकी बहीण योजनंसंदर्भातही त्यांनी आपले मत व्यक्त केले. महायुतीने ही योजना आणली असून महाविकास आघाडी सत्तेत आल्यास ही योजना बंद करेल असा प्रचार केला जात आहे. यावर बोलताना शरद पवार यांनी म्हटले की, लाडकी बहीण योजना ही आम्ही सत्तेत आल्यास रद्द करणार नाही मात्र त्यात काही बदल करू.  

दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळणार का ? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. मुख्यमंत्री पदासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी म्हटले की, सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री झाल्या तर आनंदच आहे मात्र सुप्रिया यांना देशाच्या राजकारणात अधिक रस आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group