वार्षिक 7 लाखांच्या उत्पन्नावर कर नाही ; अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
वार्षिक 7 लाखांच्या उत्पन्नावर कर नाही ; अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
img
Dipali Ghadwaje
अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग सहाव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहे. आज १ फेब्रुवारी २०२४ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहे. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांपासून संरक्षण क्षेत्रापर्यंत सर्वच गोष्टींसाठी मोठ्या घोषणा  करत असतांनाच अशातच भारतातील कर भरणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून कर रचनेत म्हणजे टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नसल्याची मोठी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली.

नव्या कररचनेत सात लाखांपर्यंतचं उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. करपात्र उत्पन्नात 3 टक्क्यांची वाढ. रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांची संख्या 2.4 टक्क्यांनी वाढली. 

टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. सध्या आयकर भरणाऱ्यांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. आता 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर आकारला जात नाही. 

आयकर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. परतावा देखील त्वरीत जारी केला जातो. जीएसटी संकलन दुपटीने वाढले आहे. जीएसटीने अप्रत्यक्ष कर प्रणाली बदलली आहे.

दहा वर्षांत करसंकलन तीन पटीने वाढले
वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, वित्तीय तूट 5.1 टक्के राहण्याचा अंदाज आहे. खर्च 44.90 कोटी रुपये असून अंदाजे महसूल 30 लाख कोटी रुपये आहे. 10 वर्षात आयकर संकलनात तीन पट वाढ झाली आहे. मी कर दरात कपात केली आहे. 7 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांवर कोणताही कर भरावा लागणार नाही. 2025-2026 पर्यंत तूट आणखी कमी होईल.

 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group