ITR भरताना या चुका करु नका, अन्यथा होईल मोठा दंड
ITR भरताना या चुका करु नका, अन्यथा होईल मोठा दंड
img
Dipali Ghadwaje
प्राप्तीकर विभागाने इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख जाहीर केली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला इन्कम टॅक्स रिटर्न भरणे अनिवार्य आहे. 

यावर्षी आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे. प्राप्तीकर विभागाने इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख जाहीर केली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला इन्कम टॅक्स रिटर्न भरणे अनिवार्य आहे. ३१ जुलैनंतर आयटीआर भरल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकता. 

आयटीआर अर्ज भरताना नेहमी तुमची अचूक माहिती भरावी. परतावा भरताना कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती भरु नये. अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागेल. अनेक कर्मचारी HRA वर सूट मिळवण्यासाठी चुकीची माहिती भरतात. खोट्या पावत्या तयार करुन घेतात.  मात्र, यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 

त्यामुळे आयकर विभागाने करदात्यांना ही कामे न करण्याचा इशारा दिला आहे. करदात्यांनी आयटीआर फाइल करताना नेहमी अचून माहिती भरावी, याबाबत आयकर विभाग नेहमी माहिती देत असते. जर तुम्ही चुकीची माहिती भरती तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group