आयकर विभागाने कोलकत्ता येथील लक्स इंडस्ट्रीजवर छापेमारी केलीय. लक्स इंडस्ट्रीजवर २०० कोटींचे कर चोरी केल्याचा आरोप आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्स इंडस्ट्रीजमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यालये आणि निवासस्थानांवर छापे टाकण्यात येत आहेत.
या छापेमारीनंतर लक्स इंडस्ट्रीजनं प्रतिक्रिया दिलीय. आमच्या कंपनीच्या परिसरात छापेमारी केली जात आहे. कंपनीचे अधिकारी आयकर विभागाला पूर्ण सहकार्य करत आहेत. सध्या छापेमारी चालू असून त्याचा काही उद्योगावर काही परिणाम होणार की नाही , हे आम्ही अद्याप सांगू शकत नाही. याचा काय परिणाम होईल हे आम्ही स्टॉक एक्सचेंजवर अपडेट करू, असं कंपनीकडून सांगण्यात आलंय.