आयकर विभागानं आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी आयटीआर भरण्याची अंतिम तारीख जाहीर केली आहे. ३१ जुलैवरून १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत ही तारीख वाढवण्यात आली आहे. ही एक दिलासादायक बाब असली तरी निष्काळजीपणा करून चालणार नाही.
विहित मुदतीत विवरणपत्र न भरल्यास प्राप्तिकर कायद्याच्या कलम-२३४ एफ अंतर्गत लेट फाइलिंग फी भरावी लागणार आहे. जर तुमचे एकूण करपात्र उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर ५,००० रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. पाच लाखरुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना एक हजार रुपयांपर्यंत दंडाची मर्यादा आहे.
हे ही वाचा...
उशीरा विवरणपत्र भरल्यास कलम २३४ अ अंतर्गत दरमहा १ टक्के व्याज आकारले जाईल. १५ सप्टेंबर २०२५ नंतर ITR दाखल होईपर्यंत किंवा महसूल विभागाकडून 'बेस्ट जजमेंट असेसमेंट' होईपर्यंत दर महिन्याला किंवा काही भागावर हे व्याज आकारले जाणार आहे. या व्याजामुळे कर दायित्वावर अतिरिक्त बोजा पडू शकतो.