कृषिमंत्री पदाला वादग्रस्त विधानांचे ग्रहण ! नव्या कृषिमंत्र्यांचे २४ तासांच्या आत वादग्रस्त विधान
कृषिमंत्री पदाला वादग्रस्त विधानांचे ग्रहण ! नव्या कृषिमंत्र्यांचे २४ तासांच्या आत वादग्रस्त विधान
img
वैष्णवी सांगळे
माणिकराव कोकाटे यांचा पदभार हटवल्यानंतर नवीन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अवघ्या २४ तासात वादग्रस्त विधान करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. राज्याचे नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे वादग्रस्त विधानाने अडचणीत येण्याची शक्यता आहे. महसूल दिनानिमित्त इंदापूर येथे केलेल्या भाषणात एक अजब आणि वादग्रस्त विधान करून उपस्थितांचे कान टवकारले. 

कबुतरांना खायला घातलं तर खबरदार ! पोलिसांकडून पहिला गुन्हा दाखल

महसूल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी म्हटले की, “सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात त्याची माणसं नोंद ठेवतात.” या विधानाने कार्यक्रमाला उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये क्षणभर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.महसूल विभागाकडून पारदर्शकता आणि प्रामाणिक सेवा अपेक्षित असताना, मंत्र्यांनी “काम वाकडं करून परत सरळ करण्याचा” सल्ला दिल्याने प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नुकतीच जबाबदारी स्वीकारलेल्या भरणे यांनी अशा स्वरूपाचे मार्गदर्शन करणे कितपत योग्य? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group