माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात रमी खेळण्याचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे कृषीमंत्रिपदावरून त्यांना काढण्यात यावं अशी मागणी विरोधकांकडून जोर धरत होती. अखेर माणिकराव कोकाटे यांची कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी करून क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार त्यांना देण्यात आला आहे. तर दत्तात्रय भरणे आता नवे कृषीमंत्री असणार आहेत.
हे ही वाचा...
दरम्यान, कृषिमंत्रीपदावरुन हटवल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. माणिकराव कोकाटे यांनी कृषीमंत्रिपदावरुन हटवून क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार दिल्यानंतर आज पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जो निर्णय घेतला आहे, तो मला मान्य आहे, असं माणिकराव कोकाटे म्हणाले. तसेच दत्तात्रय भरणेंना काही मदत लागली मी नक्की करेन आणि त्यांची मला मदत लागल्यास मी घेईन, अशी प्रतिक्रिया माणिकराव कोकाटेंनी दिली. तसेच नवीन खातं आवडलं का?, असं विचारताच I AM VERY HAPPY, असं माणिकराव कोकाटे म्हणाले.