बनावट आयकर अधिकाऱ्यांनी डॉक्टरांच्या घरातून केले कोट्यवधींचे सोने लंपास
बनावट आयकर अधिकाऱ्यांनी डॉक्टरांच्या घरातून केले कोट्यवधींचे सोने लंपास
img
वैष्णवी सांगळे
सांगलीच्या कवठेमहांकाळ येथे खळबळजनक घटना घडली आहे. शहरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. शहरातील नामांकित डॉक्टर जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरी चार अज्ञात व्यक्तींनी आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून घरात प्रवेश केला. यानंतर त्यांनी कोट्यवधींचे सोने व रोकड लंपास केली आहे. 

पुढील ४ तास महत्त्वाचे, अति मुसळधार पावसाची शक्यता

दरम्यान चार जणांनी रविवारी रात्रीच्या सुमारास घरात प्रवेश केला.डॉक्टर म्हेत्रे यांना सर्च वॉरंट दाखवत चौघांनी सिने स्टाईल पद्धतीने घराची झडती घेतली. ज्यामध्ये घरात असणारी १६ लाखांची रोकड तसेच तब्बल एक किलोच्या आसपास सोन्याचे दागिने असे जवळपास २ कोटींचे जप्त करत असल्याचे सांगत या चारही बनावट आयकर अधिकाऱ्यांनी तेथून पळ काढला. 

आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची घेतली शपथ

मात्र या प्रकरणात डॉक्टर म्हेत्रे यांना संशय आल्याने डॉक्टरांनी कवठेमहांकाळ पोलिसांना घडल्या प्रकारची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी डॉक्टरांच्या घरी धाव घेत, आयकर छापा बोगस सर्व प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र तोतया आयकर विभागाच्या धाडीमुळे सांगली जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group