भररस्त्यावर खिळे, लिंबू अन कुंकू, परिसरात भीतीचे वातावरण
भररस्त्यावर खिळे, लिंबू अन कुंकू, परिसरात भीतीचे वातावरण
img
वैष्णवी सांगळे
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातुन एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिरज तालुक्यातील टाकळी येथे भररस्त्यावर खिळे ठोकून लिंबू व कुंकू टाकण्याचा प्रकार करण्यात आला आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


टाकळी गावात गुरुवारी रात्रीच्या सुमारास रस्त्यावर चांदणीच्या आकाराची आकृती काढून त्यात लिंबू व कुंकू टाकून तसेच लिंबूत खिळे मारून उतारा टाकला होता. हा प्रकार पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी असली तरी या प्रकाराने टाकळी गावात काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 

दरम्यान ग्रामपंचायतीच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्याच रस्त्यावर वर्तुळामध्ये चांदणीची आकृती रेखाटून त्यामध्ये लिंबू व कुंकू टाकण्यात आले होते. लिंबूत खिळे देखील घुसविण्यात आले होते. सकाळी हा प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. 

दरम्यान हा अंधश्रद्धेचा प्रकार गावातीलच एका तरुणाने मोडून काढला. येथे खिळे घुसवून व कुंकू लावून टाकण्यात आलेले लिंबू घेऊन तरुणाने ते स्वच्छ धुतले. लिंबू कापून पाण्यामध्ये पिळून त्याचे सरबत बनवत पिऊन टाकले. अशा प्रकाराने माणसाच्या जीवनावर कोणताही परिणाम होत नाही. अशा गोष्टींना कोणीही घाबरू नये, असे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group