कुटुंब उद्ध्वस्त ! एकाच कुटुंबातील दोघींचा मृत्यू तर दोघे गंभीर, जादूटोण्याचा संशय
कुटुंब उद्ध्वस्त ! एकाच कुटुंबातील दोघींचा मृत्यू तर दोघे गंभीर, जादूटोण्याचा संशय
img
Vaishnavi Sangale
समस्येवर उपाय शोधण्यासाठी लोक मांत्रिकांकडे जातात ही आधुनिक भारताची मोठी शोकांतिका आहे. जीवघेणे उपाय करून कोणाचा जीव गेलाय तर कुणी जीवावर उठलंय. असेच अनेक जीवघेणे प्रकार समोर येत असताना सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे गावात देखील असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.एकाच कुटुंबातील चौघांनी विष प्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला असून जादूटोणा करणी यांची शंका आली त्यामुळे सदर कुटुंब गेल्या 15 दिवसापासून दडपणाखाली होते, अशी माहिती मिळाली आहे.

या घटनेत दुर्दैवाने सासू-सून असलेल्या दोन महिलांचा संशयास्पद मृत्यू झाला, तर  कुटुंबातीलच दोन पुरुषांची प्रकृती गंभीर आहे. या दोघांना पुढील उपचारासाठी मिरज येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. घरातील समीर पाटील यांची दोन मुले आहेत. एक सहा वर्षाचा आहे तर दुसरा सहा महिन्यांचा आहे. या दोघांना मात्र कोणतीही विषबाधा झाली नसून दोन्ही मुले सुरक्षित आहेत.घटनास्थळी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील यांनी भेट दिली असता त्या ठिकाणी चार ग्लास मिळून आले. त्या ठिकाणी लिंबू कापून ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी सूरी देखील मिळाली. त्या ठिकाणापासून बाजूलाच जनावरांसाठी वापरले जाणारे विषारी औषध देखील पोलिसांना घटनास्थळी मिळून आले. यामुळे या चार जणांनी विषारी औषध प्राशन केले असावे असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अधिक तपास पोलीस करत आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group