चर्चा तर होणारच ! बैलगाडा शर्यतीच्या विजेत्यांना मिळणार फॉर्च्यूनर, थार, टॅक्टर्स अन्... भुवया उंचावणारी बक्षिसे
चर्चा तर होणारच ! बैलगाडा शर्यतीच्या विजेत्यांना मिळणार फॉर्च्यूनर, थार, टॅक्टर्स अन्... भुवया उंचावणारी बक्षिसे
img
वैष्णवी सांगळे
देशातील सर्वात मोठी बैलगाडी शर्यत आणि बैलगाडी अधिवेशन ९ नोव्हेंबर रोजी सांगलीच्या तासगाव मध्ये पार पडत आहे. डबल महाराष्ट्र केसरी आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते चंद्रहार पाटलांच्या माध्यमातून श्री-नाथ केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैलगाडी अधिवेशन आणि शर्यत पार पडणार आहे.या शर्यतीच्या विजेत्यांसाठी भव्य दिव्य असे बक्षीस चंद्रहार पाटलांकडून जाहीर करण्यात आले आहे. जी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 



कुस्तीचं जंगी मैदान गाजवणाऱ्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी बैलगाडा शर्यतीच्या स्पर्धेतून लक्ष वेधलं आहे. कारण, चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वात भरविण्यात आलेल्या भव्य बैलगाडी शर्यतीत बक्षिसांचा धुरळा उडाला आहे. या बैलगाडा शर्यत स्पर्धेतील विजेत्या गाडामालकांसाठी 2 फॉर्च्यूनर, 2 थार, 7 ट्रॅक्टर आणि 150 दुचाकी अशी भुवया उंचावणारी बक्षिसे आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्यावतीने महाराष्ट्रातील हे पहिलं बैलगाडा शर्यत संघटनेचे अधिवेशन 9 नोव्हेंबर रोजी तासगावजवळ आयोजित करण्यात आलं आहे. दरम्यान, या बैलगाडी शर्यतीत पहिल्या, दुसऱ्या क्रमांकासाठी चारचाकी वाहने तसेच 6 ते 7 ट्रॅक्टर्सचे बक्षीस आहे. तसेच, इतर उत्तेजनार्थ 150 दुचाकी बक्षीस स्वरूपात दिल्या जाणार आहे. ओपन जनरल स्पर्धेसाठीही चारचाकी गाड्या, ट्रॅक्टर आणि दुचाकी बक्षीसे दिले जाणार आहेत. त्यामुळे, राज्यात आत्तापर्यंतची सर्वाधिक बक्षीसे, सर्वात मोठे, महागडे बक्षीसे देणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेची चर्चा जोर धरत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group