नगरपरिषद आणि नगरपंचायतच निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीच्या प्रचाराला हिंसक वळण लागले आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी वातावरण तापलं. सांगलीमधील जत नगरपरिषद निवडणूक प्रचाराचाही आज शेवटचा दिवस आहे. पण त्याआधी जतमध्ये प्रचाराला हिंसक वळण मिळालेले आहे.
जतमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जतमधील नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश शिंदे यांच्या घरावर आणि गाडीवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीमध्ये सुरेश शिंदेंच्या घराचं आणि गाडीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत अद्याप कुणालाही दुखापत झाल्याची माहिती नाही.
सोमवारी पहाटे काही अज्ञांत व्यक्तींकडून सुरेश शिंदे यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. काही लोंकांनी शिंदेंच्या दगडफेक करत शिंदेंच्या कारच्या काचाही फोडल्या. सुरेश शिंदेंकडून याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या मदतीने तपास करण्यात येत आहे.
माजी आमदार विलासराव जगतापांनी या हल्ल्यामागे भाजप असल्याचा आरोप केला. दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी केला आहे.