आयटीआर भरायला उशिर केला अन्..... ; वाचा
आयटीआर भरायला उशिर केला अन्..... ; वाचा
img
Dipali Ghadwaje
आयटीआर फाइल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै होती. ३१ जुलैनंतर आयटीआर फाइल केल्यास करदात्यांना दंड भरावा वाहक आहे. मुदतीनंतर आयटीआर भरल्यास त्याला बिलेटेड आयटीआर म्हणतात. बिलेटेड आयटीआर भरण्याची प्रोसेस सुरु झाली आहे. बिलेटेड आयटीआर फाइल करणाऱ्या करदात्यांची संख्या खूप जास्त आहेत. सरकारने आतापर्यंत ६२७ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.

बिलेटेड आयटीआर भरण्यासाठी १००० ते ५००० रुपयांचा दंड भरावा लागतो. १ ऑगस्ट ते २२ ऑगस्टपर्यंत जवळपास १४ लाखांपेक्षा अधिक करदात्यांनी बिलेटेड आयटीआर फाइल केले आहेत. यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने दंड वसूल केला आहे. आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै होती.

तुम्ही मुदतीनंतर आयटीआर फाइल केल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. मिडिया रिपोर्टनुसार, २२ ऑगस्टपर्यंत जवळपास ७.४ कोटी लोकांनी बिलेटेड आयटीआर फाइल केले आहेत. त्यामुळे दंड जमा झाला आहे.

इन्कम टॅक्सच्या नियमांनुसार, जर तुमचे उत्पन्न ५ लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ५००० रुपयांचा दंड भरावा लागेल. जर तुमचे उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला मुदतीनंतर अर्ज भरण्यासाठी १००० रुपयेदंड द्यावा लागणार आहे. बिलेटेड आयटीआर हा तुम्ही ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत भरु शकतात.

बिलिटेड आयटीआर भरण्याची प्रोसेस ही आयटीआर भरण्यासारखीच आहे. त्यासाठी करदात्यांना ई-फायलिंग पोर्टलवर जाऊन अर्ज भरावा लागेल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group