पुण्यात प्रसिद्ध ज्वेलर्सवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. पत्र्या मारुती चौक येथील सराफी दालनावर आयकर विभागाची झडाझडती सुरु आहे. हडपसर, मगरपट्टा, बाणेर या ठिकाणी देखील आयकर विभागाकडून धाडसत्र सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात प्रसिद्ध ज्वेलर्सवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. पत्र्या मारुती चौक येथील सराफी दालनावर आयकर विभागाची झाडाझडती सुरु आहे. हडपसर, मगरपट्टा, बाणेर या ठिकाणी देखील आयकर विभागाकडून धाडसत्र सुरु आहे. आयकर विभागाकडून पहाटेपासूनच ही छापेमारी सुरू आहे.
छापेमारीसाठी आयकर आधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा उपलब्ध आहे. आयकर विभागाचे 40 अधिकारी छापासत्रासाठी दाखल झाले आहेत. पुण्यातील प्रसिद्ध निळकंठ ज्वेलर्सवर आयकर विभागाच्यावतीन पहाटेपासून छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यात पहाटेच आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. पुण्यातील प्रसिद्ध निळकंठ ज्वेलर्सच्या बाणेर आणि हडपसर या परिसरातील दुकानांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. तसेच ज्वेलर्सच्या मालकाच्या घरीदेखील आयकर विभागाकडून छापेमारी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास 40 अधिकारी या कारवाईसाठी दाखल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे आयकर विभागाने ही कारवाई केल्याचे समोर येत आहे.