करदात्यांसाठी आनंदाची बातमी : आता
करदात्यांसाठी आनंदाची बातमी : आता "या" तारखेपर्यंत भरता येणार ITR
img
Dipali Ghadwaje
जर तुम्ही अद्याप तुमचे आयकर रिटर्न  भरले नसेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आयकर विभागाने ३१ जुलै २०२५ किंवा त्यापूर्वी देय असलेले आयकर रिटर्न भरण्याच्या अंतिम तारखेत बदल केला आहे. या बदलानुसार आता १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत आयटीआर दाखल करता येणार आहे.

तारीख वाढवण्याचा निर्णय का घेण्यात आला?

आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय आयटीआर फॉर्ममध्ये अलिकडेच मोठे बदल, सिस्टम अपग्रेड आणि टीडीएस (टॅक्स डिडक्टेड अॅट सोर्स) क्रेडिटमधील त्रुटींमुळे तारीख वाढवण्याचा निर्णय सीबीडीटीने घेतला आहे.

यासोबतच, आयकर फाइलिंग पोर्टलवर सिस्टम अपग्रेडचे कामही केले जात आहे. या तांत्रिक बदलांमुळे करदात्यांना वेळेवर योग्य माहिती भरण्यात अडचणी येत होत्या. याव्यतिरिक्त, अनेक करदात्यांना टीडीएस क्रेडिट जुळवण्यात अडचणी येत होत्या. या सर्व बाबींचा विचार करून आयटीआर भरण्याच्या तारेखाला मुदतवाढ देण्यात आली आहे.

दंडाशिवाय आयटीआर दाखल करण्याची संधी

नवीन तारीख लागू झाल्यानंतर, जर करदात्याने १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत आयटीआर दाखल केला तर, त्याला कोणताही दंड भरावा लागणार नाही. या मुदतवाढीचा फायदा विशेषतः वैयक्तिक करदात्यांना आणि ज्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे अनिवार्य नाही अशा लहान व्यवसायांना होणार आहे. म्हणजेच, पगारदार वर्ग, फ्रीलांसर, छोटे व्यापारी, व्यावसायिक इत्यादींना या मुदतवाढीचा फायदा होणार आहे.

करदात्यांना कागदपत्रे आणि फॉर्म तयार करण्यासाठी अधिक वेळ मिळेल. तसेच रिटर्नमध्ये कमी चुका होतील, ज्यामुळे अचूक आणि पारदर्शक फाइलिंग सुनिश्चित होईल. सिस्टमला फॉर्म बदलण्यासाठी आणि टीडीएस डेटा प्रतिबिंबित करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. यामुळे करदात्यांची चिंता दूर करण्यास आणि रिटर्न प्रक्रियेची गुणवत्ता राखण्यास मदत होईल.
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group