तुमच्या खिशावर थेट परिणाम !आजपासून होणार 'हे' मोठे बदल
तुमच्या खिशावर थेट परिणाम !आजपासून होणार 'हे' मोठे बदल
img
वैष्णवी सांगळे
सप्टेंबर २०२५ ची सुरुवात सामान्य लोकांसाठी महत्त्वाच्या बदलांसह झाली आहे. १ सप्टेंबरपासून लागू झालेल्या नियमांचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहेत. हे बदल नेमके काय जाणून घ्या. 

१)  LPG सिलेंडर स्वस्त - सप्टेंबरच्या सुरुवातीला व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत घट झाली आहे. तेल कंपन्यांनी १९ किलो सिलेंडरची किंमत ५१.५० रुपयांनी कमी केली. नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईत नवीन दर लागू झाले आहेत. मात्र, घरगुती १४ किलो एलपीजी सिलेंडरच्या दरात बदल झालेला नाही.

२) भारतीय पोस्टच्या नियमात बदल - १ सप्टेंबर २०२५ पासून पोस्ट विभागाने मोठा बदल लागू केला आहे. देशांतर्गत पोस्टल सेवेत नोंदणीकृत पोस्टला स्पीड पोस्टमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता नोंदणीकृत पोस्टही स्पीड पोस्टसारखीच पाठवली जाईल आणि डिलिव्हरी मिळेल. 

३) एसबीआय कार्डधारकांसाठी मोठा बदल  - बँकेने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, लाइफस्टाइल होम सेंटर एसबीआय कार्ड, सिलेक्ट आणि प्राइम कार्डवर काही व्यवहारांसाठी रिवॉर्ड पॉइंट्स बंद करण्यात आले आहेत. ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म, सरकारी पोर्टल्स आणि व्यापारी व्यवहारांवर आता कोणतेही रिवॉर्ड्स मिळणार नाहीत. 

४) विमान प्रवास स्वस्त - १ सप्टेंबर २०२५ पासून विमान इंधनाच्या (ATF) किमतीत घट झाली आहे. दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई येथे नवीन दर लागू झाले असून विमान कंपन्यांचा खर्च कमी होईल. त्यामुळे हवाई प्रवास स्वस्त होण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये मात्र ३% वाढ झाली होती.

५) बँकांना सुट्ट्या - आरबीआयच्या नियमानुसार सप्टेंबर महिन्यात वेगवेगळ्या राज्यांतील सण आणि कार्यक्रमांमुळे तब्बल १५ दिवस बँका बंद राहतील. मात्र, ग्राहकांना काळजी करण्याची गरज नाही कारण इंटरनेट बँकिंग आणि डिजिटल सेवा २४x७ सुरू राहणार असून घरबसल्या व्यवहार करता येतील. बँकांच्या सुट्ट्यांची संपूर्ण माहिती आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर (https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx) सहजपणे पाहता आणि तपासता येईल.

६) आयटीआर भरण्याची शेवटची तारीख - सप्टेंबर २०२५ अनेक महत्त्वाच्या कामांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आयकर विभागाने आयटीआर भरण्याची शेवटची तारीख ३० जुलैवरून १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.
LPG | ITR | september |
इतर बातम्या
Join Whatsapp Group