ITR फॉर्ममध्ये ''ही'' गोष्ट नमूद करा अन्यथा होईल 10 लाखांचा दंड, काय आहे शेवटची तारीख ?
ITR फॉर्ममध्ये ''ही'' गोष्ट नमूद करा अन्यथा होईल 10 लाखांचा दंड, काय आहे शेवटची तारीख ?
img
दैनिक भ्रमर
ITR भरत असणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे.  माहितीनुसार करदात्यांनी आपल्या परदेशातील मालमत्तेतून मिळवलेले उत्पन्न ITR मध्ये नमूद न केल्यास मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. 

प्राप्तिकर विभागाने भारतीय नागरिकांना परदेशी मालमत्ता जाहीर करण्यासाठी योग्य ITR फॉर्म भरण्याचे आवाहन केले आहे. जर त्यांनी चुकीचा फॉर्म सादर केला असेल तर आपल्या विवरणपत्रात (रिटर्न) सुधारणा करा, असं सांगण्यात आलं आहे. यामुळे तुम्ही या गोष्टी आताच करून घ्या. कारण, वेळ गेल्यावर तुम्हाला दंड होऊ शकतो.

दरम्यान , सुधारित ITR भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे. करदात्यांनी आपल्या परदेशातील मालमत्तेतून मिळवलेले उत्पन्न ITR मध्ये जाहीर न केल्यास त्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल, असा इशारा विभागाने दिला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group