राज्याचा अर्थसंकल्प सादर!  अजित पवारांनी केल्या महत्वाच्या घोषणा
राज्याचा अर्थसंकल्प सादर! अजित पवारांनी केल्या महत्वाच्या घोषणा
img
Dipali Ghadwaje
कुसुमाग्रज यांची कविता म्हणत अजित पवार यांनी अर्थसंकल्प वाचायला सुरुवात केली. पहिल्या चार महिन्यांसाठी तरतुद करण्यासाठी हा अंतरीम अर्थसंकल्प आहे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विधानभवनात अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी आवश्यक ध्येयधोरणांची अंमलबजावणी करणार असल्याची घोषणा अजित पवारांनी दिली . राज्याच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून विधानसभेत सादर करण्यात आला.  

अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये 4 लाख 98 हजार 758 कोटी रुपये महसुली जमा दाखवण्यात आला आहे. तर 5 लाख 8 हजार 492 कोटी रुपये महसुली खर्च दाखवण्यात आला आहे. तसेच महसुली तूट 9 हजार 734 कोटी रुपयांची आहे. तर राजकोषीय तूट 99 हजार 288 कोटी रुपयांची अंदाजित करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात चार महिन्यांचे लेखानुदान मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे.

अर्थसंकल्पातील प्रमुख  घोषणा
  • राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न
  • जुन्नरमध्ये शिवसंग्राहालय उभारणार
  • राज्यात गुंतवणूक वाढवण्यावर भर
  • अटल सेतू - कोस्टल रोड जोडण्यासाठी दोन बोगद्यांची निर्मिती
  • सोलापूर-तुळजापूर- धाराशिव रेल्वे मार्गासाठी भूसंपान सुरू
  • मुर्तीजापूर -यवतमाळ रेल्वेमार्गाच्या विस्तारीकरणासाठी पन्नस टक्के निधी
  • छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी पाचशे कोटींचा निधी
  • राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती निवारण उपाययोजना सुरू
  • नागपूरच्या मिहान प्रकल्पासाठी शंभर कोटींची तरतुद
  • राज्यात 200 सिंचन प्रकल्पाची कामं सुरू

इतर बातम्या
Join Whatsapp Group