आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू
आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली : 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (31 जानेवारी) सुरू होत आहे. सकाळी 11 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसद, लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. 

यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर करणार आहेत. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन 18व्या लोकसभेचा पहिला आणि मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचा अर्थसंकल्प सादर करतील.

अर्थमंत्री म्हणून सीतारामन यांचा हा सलग आठवा अर्थसंकल्प असेल. 2 फेब्रुवारीला रविवार असल्याने सुट्टी असेल. यानंतर 3 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारीदरम्यान लोकसभा आणि राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा होईल. पंतप्रधान मोदी 6 फेब्रुवारीलाच राज्यसभेत चर्चेला उत्तर देऊ शकतात.
 
दरम्यान, उद्या 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा सलग आठवा अर्थसंकल्प आहे. यामध्ये सहा मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात.

उत्पादन शुल्कात कपात केल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होऊ शकतात. सध्या पेट्रोलवर 19.90 रुपये आणि डिझेलवर 15.80 रुपये शुल्क आहे. याशिवाय, नवीन नियमानुसार, 10 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त केले जाऊ शकते.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group