बुधवारपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व खासदारांना हजर राहता यावं यासाठी खासदारांचं निलंबन रद्द करण्यात आलं आहे. मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली आहे.
संसदेत १३ डिसेंबर रोजी घुसखोरीचं प्रकरण झाल्यानंतर यावरून सभागृहात प्रचंड गोंधळ झाला होता. विरोधकांकडून सुरक्षेवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. काही खासदार पीठासीन अधिकाऱ्यांच्या खुर्चीपर्यंत पोहचले होते. यावेळी लोकसभेच्या १०० आणि राज्यसभेच्या ४६ सदस्स्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.