सोने चांदी होणार स्वस्त! कस्टम ड्युटीमध्ये 'इतक्या' टक्क्यांची घट ; मोबाईल फोन आणि चार्जरही होणार...अर्थसंकल्पात स्वस्त काय ; महाग काय?  पहा संपूर्ण यादी
सोने चांदी होणार स्वस्त! कस्टम ड्युटीमध्ये 'इतक्या' टक्क्यांची घट ; मोबाईल फोन आणि चार्जरही होणार...अर्थसंकल्पात स्वस्त काय ; महाग काय? पहा संपूर्ण यादी
img
Dipali Ghadwaje
मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत 2024-25 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात अनेक उत्पादने आणि सेवांवरील करांमध्ये बदल करण्याची घोषणा केली. करात कपात केल्यामुळे अनेक उत्पादने आता स्वस्त होणार आहेत. करवाढीमुळे अनेक उत्पादनांच्या किमती वाढणार आहेत. या अर्थसंकल्पात स्वस्त काय, महाग काय झाले याची यादी पहा.

अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी कर्करोगाच्या औषधावरील कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा केली. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, औषध आणि वैद्यकीय कर्करोगाच्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी 3 औषधांवरील कस्टम ड्युटी पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे, एक्स-रे ट्यूबवरील शुल्क देखील कमी करण्यात आले आहे. यानंतर देशात कर्करोगाची तीन औषधे स्वस्त होतील.

सरकारने पोलाद आणि तांब्यावरील मूळ कस्टम ड्युटी कमी केली आहे. सरकारने सोन्या-चांदीवरील मूळ कस्टम ड्युटीही कमी केली आहे.सरकारने मोबाईल आणि चार्जरवरील कस्टम ड्युटी 15 टक्क्यांवर आणली आहे. त्यामुळे ही उत्पादने स्वस्त होतील.

काय स्वस्त आणि काय महाग?

ह्या वस्तू झाल्या वस्तू  :
- सोने-चांदी
- आयात दागिने
- कॅन्सर औषध
- मोबाईल चार्जर
- मोबाईल
- इलेक्ट्रिक वाहने
- कपडे
- चामडी बूट, चप्पल,
- प्लॅटिनम
- विद्युत तारा
-एक्स-रे मशीन
- सौर संच

महाग :
प्लास्टिक सामान

इतर बातम्या
Join Whatsapp Group