इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल ; नोकरदारांचे 'इतके' रुपये वाचणार ... आता कसा लागणार आयकर ; वाचा
इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल ; नोकरदारांचे 'इतके' रुपये वाचणार ... आता कसा लागणार आयकर ; वाचा
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी संसदेत एनडीए सरकारचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी सामान्य नोकरदारांच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या नव्या Income Tax Slab विषयी घोषणा केली.  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकरसंदर्भात मोठी घोषणा केली. 

जुन्या करणप्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, नव्या करप्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाची घोषणा केली.

नव्या करणप्रणालीचा अवलंब करणाऱ्या नोकरदरांचे 17, 500 रुपये वाचणार आहेत.  याशिवाय, नव्या करप्रणालीत स्टँटर्ड डिडक्शनची मर्यादा 50 हजारावरुन 75 हजारापर्यंत वाढवण्यात येणार आहे. तर फॅमिली पेन्शन डिडक्शनची मर्यादा 15 हजारावरुन 25 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

नव्या करप्रणालीनुसार कोणत्या उत किती रक्कम भरावी लागणार?

3 लाख रुपये- कोणताही कर नाही
3 लाख ते 7 लाख रुपये- 5 टक्के 
7 लाख ते 10 लाख रुपये- 10 टक्के 
10 लाख ते 12 लाख- 15 टक्के
12 लाख ते 15 लाख - 20 टक्के 
15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न- 30 टक्के 
इतर बातम्या
Join Whatsapp Group