केंद्र सरकारचा मोठा निर्णय; मिशन 'इंद्रधनुष' अंतर्गत 9 ते 14 वर्षांच्या मुलींना मोफत लस
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; मिशन 'इंद्रधनुष' अंतर्गत 9 ते 14 वर्षांच्या मुलींना मोफत लस
img
DB
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सलग सहाव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यंदा निवडणुकीचं वर्ष असल्यामुळे अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी मोदी सरकारच्या आतापर्यंतच्या कामाचा लेखाजोगा सांगितला. अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, अर्थसंकल्पात आरोग्य विभागाच्या विकासाबाबत भरपूर समावेश करण्यात आला आहे. सर्वाईकल कॅन्सर रोखण्यासाठी 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींसाठी मोफत लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे. मिशन 'इंद्रधनुष' अंतर्गत हे अभियान सुरू करण्यात येणार आहे.

आरोग्य सेवा क्षेत्रासाठी अंतरिम अर्थसंकल्प 2024 चे ठळक मुद्दे
 
केंद्र सरकार 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींना सर्वाईकल कॅन्सरची लस मोफत पुरवणार आहे.

आयुष्मान भारत योजनेंतर्गत आरोग्य कवच सर्व आशा आणि अंगणवाडी सेविका आणि सहाय्यकांना देण्यात येईल. 

माता आणि बाल आरोग्य सेवेबद्दल, एफएम म्हणाले, माता आणि बाल आरोग्य सेवेसाठी विविध योजना राबवल्या जातील. अंगणवाड्यांचा दर्जा वाढविला जाईल.

'सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' लस बनवणार 
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सर्वाइकल कॅन्सर टाळण्यासाठी Cervavac नावाची लस विकसित करेल, जी HPV च्या चार प्रकारांपासून संरक्षण प्रदान करते - 16, 18, 6 आणि 11. SII चे CEO आदर पूनावाला यांनी आधीच सांगितलं होतं की, या लसीची किंमत 200-400 रुपये प्रति रुपये डोस असेल. सध्या बाजारात गर्भाशय ग्रीवाच्या लसी उपलब्ध आहेत. त्या लसींची किंमत प्रति डोस 2,500 ते 3,300 रुपये आहे.
 
अर्थमंत्री म्हणाल्या की, देशात महिलांसाठी अनेक योजना राबविण्यात येत असून त्यामुळे त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होत आहे. लखपती दीदी योजनेंतर्गत देशात 1 कोटी लखपती दिदी बनल्या आहेत. त्यांचं उद्दिष्ट 2 कोटींवरून 3 कोटी करण्यात आलं असून 3 कोटी लखपती दिदी तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना सर्वाईकल कॅन्सरची लस दिली जाईल, जेणेकरून हा कर्करोग टाळता येईल.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group