मोठी बातमी!  घाटात शाळेची बस उलटल्याने दोघांचा मृत्यू, 55 जखमी
मोठी बातमी! घाटात शाळेची बस उलटल्याने दोघांचा मृत्यू, 55 जखमी
img
Dipali Ghadwaje
रायगडमध्ये एक भीषण अपघात घडल्याची बातमी समोर येत असून, पुण्याहून शाळेची सहल कोकणात येत असताना बसचा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी असल्याने अपघतानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली.  परिसरातील नागरिकांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. या अपघातात  55 जण जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिकाची गरज असल्याने, महाड, माणगाव इथून बचाव पथके, आणि रुग्णवाहीका बोलवण्यात आल्या. त्यानंतर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. 

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महाड, माणगाव इथून बचाव पथके, रुग्णवाहीका घटना स्थळाकडे रवाना झाले आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, 55 जखमी आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. 

रायगडमधील माणगाव ते पुणे दरम्यानच्या ताम्हीणी घाटात एक खासगी बस उलटल्याने भीषण अपघात झाल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे. पुण्याहून शाळेची सहल कोकणात जात असताना ताम्हीणी घाटात या बसचा अपघात होऊन बस उलटली. ताम्हिणी घाटात अवघड वळणावर बस चालकाचा नियंत्रण सुटल्याने बस उलटली असल्याचे बोलले जात आहे.

अपघातात बसमधील अनेक प्रवासी अडकले होते. दरम्यान, कोंडेघर गाव हद्दीत हा अपघात झाला होता आणि अपघाताची माहिती मिळताच गावकरी मदतीला धावून आले. नागरिकांनी बसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना बाहेर काढले. ज्यात दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. तर, 55 जखमी आहेत. 

क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस बाजूला
पुणे-माणगाव मार्गावर ताम्हिणी घाटात खाजगी बसला झालेल्या अपघातात 2 महिला प्रवासी ठार झाल्या, तर 55 प्रवासी जखमी झाले आहेत. ही बस पुण्याहून हरीहरेश्र्वर येथे पर्यटकांना घेवून येत असताना सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोंडेघर गावाजवळ अवघड वळणावर उलटली. जखमी प्रवाशांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे.

 


 
इतर बातम्या
Join Whatsapp Group