नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये शिक्षिकेने विद्यार्थ्यावर लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ३५ वर्षीय महिला शिक्षिकेकडून दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा वर्षभरापासून लैंगिक छळ सुरू होता. ही शिक्षिका रात्री उशिरा विद्यार्थ्याला व्हिडीओ कॉल करायची आणि अश्लिल मेसेजेस पाठवायची. पोलिसांनी आरोपी शिक्षिकेविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून तिला अटक करण्यात आली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील एका खासगी शाळेतील शिक्षिकेने दहावीमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याचा लैंगिक छळ केला.
या प्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकाने पोलिस ठाण्यात धाव घेत शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली. अश्लील व्हिडिओ कॉल केल्याप्रकरणी कोपरखैरणे पोलिस ठाण्यात शिक्षिकेविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी पोलिसांनी या शिक्षिकेला अटक केली.
सदर शिक्षिका ही इन्स्टाग्रामवर अर्धनग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल करत होती. याबाबतची माहिती विद्यार्थ्याने त्याच्या पालकांना सांगितली तेव्हा पालकांना मोठा धक्का बसला.
या विद्यार्थ्याच्या पालकांनी कोपरखैरणे पोलिस ठाणे गाठून शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आणि शिक्षिकेला अटक केली.
न्यायालयाने शिक्षिकेला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. शिक्षिकेने आणखी कोणासोबत अशा प्रकारचे कृत्य केले आहे का? या दिशेने कोपरखैरणे पोलिस अधिक तपास करत आहेत.
मुलगा रात्री उशिरापर्यंत मोबाइलवर काही तरी पाहत असतो हे पालकांच्या लक्षात आले होते. या विद्यार्थ्याच्या आईला त्याच्यावर संशय आला. त्यामुळे तिने मोबाइल चेक केला तर त्यामध्ये शिक्षिकेच्या अश्लिल व्हिडीओ कॉलचे रेकॉर्डिंग सापडले. त्यानंतर आईने या मुलाकडे विचारपूस केली असताना त्याच्यासोबत गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आरोपी शिक्षिका ५ ते ७ वीच्या विद्यार्थ्यांना शिकवते. पण ती दहावीच्या मुलांचे एक्स्ट्रा क्लासेस घ्यायची यातून ती विद्यार्थ्याच्या संपर्कात आली होती.