आनंदाची बातमी ! राज्यात मोठी शिक्षक भरती; 'या' दिवसापासून सुरू होणार अर्जप्रक्रिया
आनंदाची बातमी ! राज्यात मोठी शिक्षक भरती; 'या' दिवसापासून सुरू होणार अर्जप्रक्रिया
img
वैष्णवी सांगळे
शिक्षण होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकाच्या शाळांमध्ये शिक्षक भरती होणार आहे. सुमारे ९००० शिक्षकांची भरती केली जाणार आहे. यामध्ये २०२४-२५ आणि मे २०२६ पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या जागांचादेखील समावेश आहे.

राज्यातील शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे होणार आहे. मार्चपासून ही भरती प्रक्रिया सुरु केली जाणार आहे, असं शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. २५ मार्च २०२४ च्या निर्णयानुसार, जिल्हा परिषदेच्या शाळांची २०२५-२६ मध्ये संचमान्यता पूर्ण झाले. यामध्ये अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे पहिल्यांदाच समायोजन करणार आहेत. यामध्ये रिक्त पदांच्या ८० टक्के जागा भरल्या जाणार आहे.

राज्यातील सर्व जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकांना २०२६ मेपर्यंत निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची पदे समाविष्ट करुन त्याची जाहिरात अपलोड करण्यास सांगितले आहे. पवित्र पोर्टलवरुन ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. राज्यात एकूण १.९० लाख मंजूर पदे आहेत. यामध्ये सध्या ६००० पदे रिक्त आहेत. यात अतिरिक्त शिक्षकांची संख्या २४०० आहे. मे २०२६ पर्यंत निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या ५५०० आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group