शिक्षकांसाठी महत्वाची बातमी! शिक्षकांच्या पगारात
शिक्षकांसाठी महत्वाची बातमी! शिक्षकांच्या पगारात "इतके" टक्के वाढ होणार?
img
DB
शिक्षकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. अडीच वर्षांच्या महायुती सरकारच्या निवडणुकीच्या काही दिवस आधी म्हणजेच 14 ऑक्टोबर 2024 रोजी शिक्षकांच्या पगारवाढीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. मात्र, आचारसंहिता लागू झाल्यानं या निर्णयाला स्थगिती देण्याची वेळ ओढवली होती. पण आता निवडणुका पार पडल्यानंतर आता शिक्षकांच्या पगारवाढीचा मार्ग मोकळा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याअगोदर राज्यातील सुमारे ५० हजार शिक्षकांना 20 टक्के अनुदान टप्पा वाढ देण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शिक्षण विभागाने संबंधित पात्र शाळा आणि शिक्षकांची माहिती दहा डिसेंबरपर्यंत मागवली होती. राज्य सरकारच्या या निर्णयाचा जवळपास 50 हजार शिक्षकांना लाभ घेता येणार आहे.

या निर्णयानुसार पात्र शिक्षकांना 20 टक्के अनुदान वाढ मिळणार आहे. त्यानुसार शिक्षण विभागाकडून संबंधित पात्र शाळा आणि शिक्षकांची माहिती 10 डिसेंबरपर्यंत मागवण्यात आली होती. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे तब्बल 12 वर्षांची  शिक्षकांची प्रतीक्षा संपणार आहे. 

दरम्यान आता 14 ऑक्टोबर 2024 च्या निर्णयामुळे शिक्षकांना 80 टक्के वेतन मिळणार असून साधारणपणे 1 जूनपासून शिक्षकांना वाढीव अनुदान मिळण्याची शक्यता वर्तवली  जात आहे. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group