..तर नोकरी सोडावी लागणार ! शिक्षकांवर सेवानिवृत्तीची टांगती तलवार
..तर नोकरी सोडावी लागणार ! शिक्षकांवर सेवानिवृत्तीची टांगती तलवार
img
वैष्णवी सांगळे
शिक्षकवर्गासाठी महत्त्वाची बातमी आहे. ज्या शिक्षकांचे वय ५२ पेक्षा कमी आहे त्या शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाने टीईटी परीक्षा देणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे आता सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा द्यावी लागणी आहे. ज्या शिक्षकांचे वय ५२ पेक्षा कमी आहे त्यांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार आहेत.

शिक्षकांसाठी होणारी ही टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला होणार आहे. जे शिक्षक ही परीक्षा देणार नाहीत किंवा उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना सक्तीची सेवानिवृत्ती घ्यावी लागणार आहे. शालेय शिक्षक विभागाच्या निर्णयानुसार, २०१३ पासून शिक्षक होण्यासाठी टीईटी परीक्षा बंधनकारक केली आहे. त्याआधीच्या शिक्षकांना टीईटी परीक्षा बंधनकारक नव्हती. 

दरम्यान, आता सर्वच शिक्षकांना टीईटी परीक्षा द्यावी लागणार असल्याचे सर्वोच्च न्यायलयाने एका निकालात म्हटलं आहे. महाराष्ट्राने अद्याप पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबत कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे राज्यातील दीड ते पावणे दोन लाख शिक्षकांना टीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे. ही परीक्षा देण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी देण्यात आली आहे. दरम्यान, ही परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास शिक्षकांवर सक्तीची सेवानिवृत्तीची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा न्यायालयाने दिला आहे.



इतर बातम्या
Join Whatsapp Group