सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर काल (सोमवारी) सर्वोच्च न्यायालयात एका ७१ वर्षीय वकिलाने बूट फेकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. या प्रकारामुळे देशभरातून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. आरोपी वकिलाचे नाव राकेश कुमार असे असून, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारनी कायदेशीर कारवाई करण्यास नकार दिल्यानंतर, आरोपी वकील राकेश कुमार यांची सुटका करण्यात आली आहे.

भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी काही दिवसांपूर्वी खजुराहो येथील विष्णू मूर्तीच्या पुनर्बांधणीची याचिका फेटाळून लावली होती. कारण ते भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या अधिकारक्षेत्रात येते. 'तुम्ही इथून जा आणि भगवान विष्णूकडे प्रार्थन करा आणि त्यालाच काहीतरी करायला सांगा. तुम्ही असा दावा करत आहात की, तुम्ही विष्णूचे भक्त आहात. मग भगवान विष्णूलाच काहीतरी करायला सांगा', असे सरन्यायाधीश गवई यांनी म्हटले होते.
या वक्तव्यावरुन वाद मोठा निर्माण झाला होता. यावरुन राकेश किशोर प्रचंड नाराज झाला होता. त्यामुळे राकेश किशोर याने सोमवारी सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.या प्रकारानंतर बार कौन्सिल ऑफ इंडियाने राकेश किशोर याच्यावर कठोर कारवाई करत त्याची वकिलीची सनद रद्द केली.
राकेश किशोर याने बूट फेकल्यानंतरही सरन्यायाधीश गवई यांनी मनाचा मोठेपणा दाखवत त्याच्यावर गुन्हा दाखल न करता त्याला माफ केले होते. मात्र, यानंतरही राकेश किशोर याचा मुजोरपणा कायम आहे. त्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, परमात्म्याने माझ्याकडून जे करवून घेतले ते मी केले. मला या गोष्टीचे कोणतेही दु:ख नाही. मी कोणाचीही माफी मागणार नाही, असे राकेश किशोर याने म्हटले.
१६ सप्टेंबरला एका व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गवई साहेबांनी त्या दाव्याची थट्टा उडवली. त्यांनी म्हटले की, तुम्ही मूर्तीला प्रार्थना करा, मूर्तीलाच सांगा, स्वत:ची पुर्नबांधणी करा. जेव्हा न्यायालयात दुसऱ्या धर्माबाबतच्या याचिका येतात तेव्हा मोठे निर्णय घेतले जातात. पण जेव्हा सनातन धर्माबाबतची याचिका न्यायालयात येते तेव्हा न्यायालय त्याबाबत काहीतरी नकारात्मक निर्णय देते.
मी हिंसेच्या विरोधात आहे. माझ्यावर आजपर्यंत एकही केस दाखल नाही. मीदेखील खूप शिक्षण घेतलेले आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे. मी नशेतही नव्हतो. मात्र, माझ्यासारख्या व्यक्तीने हे कृत्य का केले, याचा विचार करा. माझ्यावर कोणतीही कारवाई झाली तरीही हरकत नाही, मी त्यासाठी तयार आहे, असे राकेस किशोर याने म्हटले.