नवी दिल्ली (भ्रमर वृत्तसेवा) :- सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम व्हिव्हिपॅटबाबत निकाल दिला आहे. तसेच बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची याचिका फेटाळली आहे. पडताळणीची मागणी करणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळल्या.
देशात लोकसभा निवडणुकीचा दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु असताना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. पडताळणीची मागणी करणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे व्हिव्हिपॅट स्लिपसह ईव्हीएमद्वारे 100 टक्के मते जुळवण्याच्या मागणीला मोठा धक्का बसला आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने यासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकांवर निर्णय दिला आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) संघटना आणि इतर काहींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. त्यात ईव्हीएमशी व्हीव्हीपॅट स्लिप 100 टक्के जुळण्याची मागणी केली होती. ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटीमध्ये कोणतीही छेडछाड शक्य नाही, असे निवडणूक आयोगाने खंडपीठाला सांगितले होते.
आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला मशीन्सची सुरक्षा, त्यांचे सील करणे आणि त्यांच्या प्रोग्रामिंगबद्दल देखील माहिती दिली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायलयाने हा निर्णय दिला आहे.