बाळासाहेब थोरातांसह अभिषेक कळमकरयांनीही ईव्हीएम पडताळणी अर्ज घेतला मागे
बाळासाहेब थोरातांसह अभिषेक कळमकरयांनीही ईव्हीएम पडताळणी अर्ज घेतला मागे
img
Dipali Ghadwaje
राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये आघाडीच्या अनेक मातब्बर उमेदवारांना पराभवला सामोरे जावे लागले त्यानंतर या उमेदवारांकडून ईव्हीएम  तपासणी आणि पडताळणीसाठी अर्ज दाखल करण्यात आले होते मात्र आता काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात  व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभिषेक कळमकर  यांनी ईव्हीएम तपासणी आणि पडताळणीसाठी दाखल केलेले अर्ज मागे घेतले आहेत. त्यापूर्वी राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे  यांनी देखील अर्ज मागे घेतला होता.


 विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले तर दुसरीकडे आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाला. यामधील काही पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएम पडताळणी बाबत अर्ज दाखल करण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे नगर जिल्ह्यातून अनेक अर्ज दाखल करण्यात आले होते मात्र आता याच बाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब थोरात तसेच नगर शहर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिषेक कळमकर यांनी अर्ज दाखल केले होते. ईव्हीएम बाबत शंका उपस्थित करत थोरात यांनी 14 मतदान केंद्रांवरील तर कळमकर यांनी 3 मतदान केंद्रांवरील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट तपासणी व पडताळणी करण्याची मागणी केली होती. यासाठी थोरातांनी तब्बल 6 लाख 60 हजार 800 रुपये तर कळमकर यांनी 1 लाख 41 हजार 600 रुपये शुल्क भरलेले आहे.

मात्र, या दोन्ही उमेदवारांनी जिल्हा निवडणूक अधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्याकडे मंगळवारी अर्ज सादर केला. ईव्हीएम तपासणी व पडताळणीसाठी दाखल केलेले अर्ज मागे घेत असल्याचे अर्जात नमूद केले. तसेच तपासणीसाठी भरलेले शुल्क देखील परत मिळावे अशी मागणी केली आहे.


 
इतर बातम्या
Join Whatsapp Group