पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सासवडमधील तहसीलदार कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ईव्हीएम यंत्र चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. इव्हीएम यंत्र चोरणाऱ्या चोरट्याला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपले आहे. ग्रामीण पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीन चोरी झाले होते. यावरच आता निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाने याप्रकरणी येथील तहसीलदाराला सस्पेंड केलं आहे.
निडवणूक आयोगाने याप्रकरणी एक पत्रक ही जाहीर केलं आहे. यात सांगण्यात आलं आहे की, याप्रकरणी आयोगाने संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
यात पुढे सांगण्यात आलं आहे की, आयोगाने परिच्छेद 6 (अ) मध्ये समाविष्ट असलेल्या प्रशिक्षण आणि जागरूकता स्ट्राँग रूमच्या सुरक्षा प्रोटोकॉलची खात्री न केल्याबद्दल जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे आणि पोलिस अधीक्षक (ग्रामीण), पुणे यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्याचे निर्देश दिले आहेत.