आगळयावेगळया प्रेमाची गोष्ट! शिक्षकाच्या बदलीने विद्यार्थ्यांनी केले शाळेचे दरवाजे बंद
आगळयावेगळया प्रेमाची गोष्ट! शिक्षकाच्या बदलीने विद्यार्थ्यांनी केले शाळेचे दरवाजे बंद
img
Jayshri Rajesh
विद्यार्थ्यांचे शिक्षकांवरील प्रेमाचे एक आगळेवेगळे उदाहरण तेलंगणामध्ये पाहायला मिळाले. इथे सरकारी शाळेतील शिक्षकाची दुसऱ्या शाळेत बदली झाल्यावर मुलांनीही शाळेत जाणे बंद केले. त्यानंतर त्यांनी जिथे आपल्या आवडत्या शिक्षकाची बदली झाली होती, त्या नवीन शाळेत प्रवेश घेतला. 

जे श्रीनिवास असे या शिक्षकाचे नाव असून, ते मंचेरियल जिल्ह्यातील जन्नाराम परिसरात असलेल्या पोनाकल गावातील सरकारी प्राथमिक शाळेत शिक्षक होते. जे श्रीनिवास हे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असे लोकप्रिय शिक्षक आहेत.

जे श्रीनिवास यांची 1 जुलै रोजी बदली करण्यात आली होती. या तारखेला ते अक्कापेल्लीगुडा येथील शाळेत पोस्टिंग घेणार होते. शाळेतील मुलांना ही बातमी समजताच त्यांनी श्रीनिवास यांनी बाहेर पडू नये म्हणून, शाळेचे दरवाजे बंद केले. त्यानंतर मुलांना खूप समजावल्यावर त्यांनी श्रीनिवास यांना जाऊ दिले.

 ही माहिती मुलांनी नंतर त्यांच्या पालकांना दिली. त्यांनतर मुलांनी शिक्षकासोबत त्यांच्या अक्कापेल्लीगुडा शाळेत जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी मुलांच्या पालकांनीही त्यांना पाठिंबा दिला. आता एकूण 133 मुले तीन किलोमीटर अंतरावरील नवीन सरकारी शाळेत जाणार आहेत. शिक्षकाच्या बदलीचा आदेश अधिकृत होता आणि त्याचे पालन करणे आवश्यक होते. त्यामुळे आता शिक्षकांसोबत मुलांनीही शाळा सोडली आणि शिक्षक गेले त्याच ठिकाणी प्रवेश घेतला. या शाळेत एकूण 250 विद्यार्थी होते.

 श्रीनिवास हे पोन्नकल येथील शाळेत 12 वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी खूप मेहनत घेऊन इथे इयत्ता 1 ते 5 मधील विद्यार्थ्यांची संख्या 32 वरून 250 पर्यंत वाढवली. यातील 133 मुलांनी अक्कापेल्लीगुडा शाळेत प्रवेश घेतल्यानंतर तिथल्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या आता 154 वर पोहोचली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group