तेलंगणामधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. तेलंगणातील दिंडीगुल येथील एअर फोर्स अकादमी येथे प्रशिक्षणादरम्यान ट्रेनर विमान कोसळल्याची बातमी समोर आली आहे. मेडक जिल्ह्यात ही घटना घडली. या दुर्घटनेत दोन भारतीय वायुदलाच्या वैमानिकांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातानंतर विमानाने पेट घेतला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणामध्ये हवाई दलाचे प्रशिक्षण विमान कोसळले आहे. यामध्ये दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक वैमानिकांध्ये एक प्रशिक्षक आणि एका कॅडेटचा समावेश आहे. सोमवारी (४, डिसेंबर) सकाळी ८.५५ वाजता हा अपघात झाला. भारतीय हवाई दलाने या अपघाताची माहिती दिली आहे.
वायुसेनेने सांगितले की, आज सकाळी नियमित प्रशिक्षणादरम्यान PC 7 Mk II विमानाला अपघात झाला. त्यात दोन पायलट होते. दोघांनाही गंभीर दुखापत झाली आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. मात्र, यामध्ये कोणत्याही नागरिकाची जीवितहानी झालेली नाही. एअरफोर्स अकादमीत प्रशिक्षणादरम्यान दिंडीगुलमध्ये हा अपघात झाला. मृतांमध्ये एक प्रशिक्षक आणि एका कॅडेटचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणातील मेडक जिल्ह्यात हा अपघात झाला. विमानात भारतीय हवाई दलाचे दोन अधिकारी होते. हा अपघात झाला तेव्हा विमान तूप्रन भागात होते. एअरफोर्स अकादमी डुंडीगल येथून विमानाने उड्डाण केले होते.