2025 मध्ये अनेक भीषण विमान अपघाताच्या घटना घडल्या आहेत. गेल्या सात महिन्यांमध्ये विमान अपघातात तब्बल 499 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतासह जगभरात विमान अपघातांची मालिका सुरुच आहे. भारत आणि बांगलादेशात विमान नागरी वस्तीत कोसळून मोठी जिवितहानी झाली असतानाच आता इटलीमधील ब्रेशियाजवळील A21 कॉर्डामोल-ओस्पिटेल महामार्गावर एक अल्ट्रालाईट विमान कोसळले.
प्राथमिक माहितीनुसार, वैमानिकाने आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु कमी वेगामुळे विमानावरील नियंत्रण सुटले. इटलीच्या राष्ट्रीय उड्डाण सुरक्षितता संस्थेने अपघाताची चौकशी सुरू केली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे विमान महामार्गावर कोसळताच त्याला भीषण आग लागली, विमान कोसळल्यानंतर हायवेवरील दोन धावत्या कारही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या
एक कार थेट या आगीत घुसल्याचं पाहायला मिळालं. मात्र त्यानंतर ही कार सुरक्षितरित्या पुढे निघाल्याचं या व्हिडीओमधून दिसून येत आहे. या अपघातात विमान चालवणारे 75 वर्षीय वकील सर्जियो रवाग्लिया आणि त्यांची 55 वर्षीय पत्नी अण्णा मारिया डी स्टेफानो यांचा मृत्यू झाला. तर 2 जण जखमी झाले.