अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताचे धक्कादायक कारण समोर
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताचे धक्कादायक कारण समोर
img
दैनिक भ्रमर
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातावरील १५ पानांचा रिपोर्ट समोर आला आहे. अहमदाबादवरून लंडनला जाणारे विमान अवघ्या काही सेकंदात कोसळलं होतं, या दुर्घटनेत २७५ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. एअर इंडियाच्या विमानाची दुर्घटना का झाली? याला नेमकं जबाबदार कोण? या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. रिपोर्ट्सनुसार, अहमदाबाद विमानतळावरून लंडनला निघालेले एअर इंडियाच्या विमानातील दोन्ही इंजिन ३ सेकंदात बंद पडली होती, त्यानंतर २९ सेकंदात विमान अहमदाबाद विमानतळाजवळच्या इमारतीवर कोसळलं. या दुर्घटनेत २७५ जणांचा मृत्यू झाला. १२ जून २०२५ रोजी ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेचा रिपोर्ट समोर आलाय.

एअर इंडियाने २०१८ च्या एफएए मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे तपासातून समोर आलेय. याप्रकरणी डीजीसीएने कठोर कारवाई करत एअर इंडियाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केले. यामध्ये विभागीय उपाध्यक्ष चुडा सिंग, मुख्य व्यवस्थापक पिंकी मित्तल आणि पायल अरोरा यांचा समावेश आहे. त्यांच्यावर विमान सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला. डीजीसीएने क्रू शेड्युलिंगशी संबंधित जबाबदाऱ्यांमधून त्यांना तात्काळ हटवण्याचे निर्देश दिले.

विमान अपघात कसा झाला?
अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला उड्डाणानंतर अवघ्या 32 सेकंदांत अपघात झाला. तपास अहवालानुसार, उड्डाणानंतर काही सेकंदांतच इंधन कटऑफ स्विच चालू झाल्याने दोन्ही इंजिनांना इंधनपुरवठा बंद झाला. कॉकपिट ऑडिओनुसार, एका पायलटने सह-पायलटला “तू इंधन का बंद केलं?” असा प्रश्न विचारला, यावर सह-पायलटने “मी काहीच केलं नाही” असे उत्तर दिले.

इंजिन बंद झाल्याने रॅम एअर टर्बाइन आपोआप चालू झाली. पण इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. इंजिन 1 आंशिकरीत्या सुरू झाले, पण इंजिन 2 कार्यरत झाले नाही. विमान रनवेपासून 0.9 नॉटिकल मैलांवर एका हॉस्टेलवर कोसळले.

थ्रस्ट लिव्हर निष्क्रिय आढळले, पण ब्लॅक बॉक्सनुसार टेकऑफ थ्रस्ट चालू होते.

इंधन स्वच्छ आढळले. त्यामध्ये कोणताही दूषितपणा नव्हता.

फ्लॅप (5 अंश) आणि गियर (डाउन) सामान्य होते.

हवामान स्वच्छ, दृश्यमानता चांगली आणि पक्ष्यांची हालचाल नव्हती.

पायलट अनुभवी, वैद्यकीयदृष्ट्या निरोगी आणि प्रशिक्षित होते.

तोडफोडचा कोणताही पुरावा नाही, पण इंधन स्विचच्या संभाव्य बिघाडाबाबत एफएएची पूर्वसूचना होती. ज्याकडे एअर इंडियाने दुर्लक्ष केले.

विमानाचे वजन आणि संतुलन योग्य होते, आणि कोणतेही धोकादायक सामान नव्हते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group